ख्राइस्टचर्च -पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बाबरच्या जागी मोहम्मद रिझवान कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० मालिकेपूर्वी सरावादरम्यान आझमला अंगठ्याची दुखापत झाली. यामुळे तो टी-२० मालिका आणि त्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला नाही.
हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार
रविवारपासून या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघाचे डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले, "बाबरची दुखापत सुधारली आहे, परंतु अद्याप तो पूर्णपणे सावरलेला नाही. तो आमचा कर्णधार आहे आणि आमचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. वैद्यकीय संघ त्याच्या दुखापतीचा आढावा घेत आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या घरच्या मालिकेसाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे."