महाराष्ट्र

maharashtra

PAK VS SA : द. आफ्रिकेच्या एडन मार्क्रमने टिपला अप्रतिम झेल, पाहा व्हिडीओ

By

Published : Feb 4, 2021, 9:22 PM IST

Updated : Feb 4, 2021, 10:00 PM IST

दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. पहिल्या दिवशी आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडन मार्क्रम याने अप्रतिम झेल टिपला.

babar-azam-fawad-ali-lead-pakistans-recovery-vs-south-africa
PAK VS SA : द. आफ्रिकेच्या एडन मार्क्रमने टिपला अप्रतिम झेल, पाहा व्हिडीओ

रावळपिंडी - पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात, पहिल्या दिवसाअखेर पाकची अवस्था ३ बाद १४५ धावा अशी झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानी संघाची सुरुवात फारच वाईट झाली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. पहिल्या दिवशी आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडन मार्क्रम याने अप्रतिम झेल टिपला.

सलामीवीर फलंदाज इमरान बट्ट वैयक्तिक १५ धावांवर बाद झाला. यानंतर अझहर अली शून्यावर माघारी परतला. तेव्हा पाकची अवस्था २ बाद २१ अशी झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडन मार्क्रम याने अप्रतिम झेल टिपत पाकिस्तानला आणखी अडचणीत आणले.

मार्क्रम याने नार्खियाच्या गोलंदाजीवर आबीद अली याचा जबरदस्त झेल टिपला. त्याने ज्या प्रकार झेल टिपला ते पाहून कॉमेंटेटर, प्रेक्षकांसोबत पाकिस्तानी फलंदाज पण चकीत झाला. त्याच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, स्वत: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आबीद अली बाद झाल्यानंतर पाकची अवस्था ३ बाद २२ अशी झाली. तेव्हा कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम या दोघांनी पाकच्या डावाची पडझड रोखली. दोघांनी नाबाद १२३ धावांची भागिदारी केली. बाबर ७७ तर आलम ४२ धावांवर नाबाद राहिले. दरम्यान, उभय संघात दोन सामन्याची मालिका खेळली जात असून यातील पहिला सामना पाकिस्तानने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे.

हेही वाचा -भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

हेही वाचा -शार्दुल-सुंदरची फलंदाजी पाहत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं.., विराटने सांगितला 'तो' किस्सा

Last Updated : Feb 4, 2021, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details