साऊथम्प्टन -इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने मोठी कामगिरी केली आहे. अझरने कसोटीत ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला. या कसोटीत ४३ धावा करत त्याने हा टप्पा पार केला.
अशी कामगिरी करणारा अझर अली हा पाचवा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. अझर अलीच्या शानदार नाबाद शतकी खेळीनंतरही पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी फॉलोऑनला सामोरे जावे लागले. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७३ धावा करू शकला. इंग्लंडकडे अद्याप ३१० धावांची आघाडी आहे.