नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव स्मिथने आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत स्मिथने दुसरे स्थान पटकावले आहे.
'सावधान विराट! स्मिथ येतोय' आयसीसी क्रमवारीत स्मिथची दुसऱ्या स्थानी झेप - टीम इंडियाचा विराट कोहली
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम असला तरी स्मिथ विराटच्या फक्त ९ गुणांनी मागे आहे. विराटचे ९२२ तर स्मिथचे ९१३ गुण झाले आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम असला तरी स्मिथ विराटच्या फक्त ९ गुणांनी मागे आहे. विराटचे ९२२ तर स्मिथचे ९१३ गुण झाले आहेत. स्मिथबरोबर ट्रेविस हेड १८ व्या, तर, स्मिथच्या जागी संधी मिळालेला मार्कस लाबुशाने १६ व्या स्थानी आहे. लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला सात वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच अंतिम दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळाले आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी कायम आहे.
बंदीनंतर परतलेल्या स्मिथने दमदार पुनरागमन करत टीकाकारांची तोंडे बंद केली. सध्या चालू असलेल्या अॅशेसमध्ये स्मिथने चांगली कामगिरी केली आहे. स्मिथने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने नाबाद ९२ धावांची खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू लागल्याने स्मिथला या सामन्यातून माघार घ्यावी लागली.