मेलबर्न -कोरोनाच्या वातावरणात गरज भासल्यास खेळाडू आपल्या मानधनात कपात करू शकतात, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले होते, की कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मानधन कपातीस तयार - हेजलवूड - जोश हेजलवूड मानधन कपात न्यूज
ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पैशांची कमतरता असल्याचे वृत्त आहे. हेजलवूड म्हणाला, ''यामुळे मला थोडा धक्का बसला. फुटबॉल हंगाम सुरू झाला असताना हा साथीचा रोग पुढे आला. आम्ही चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत. आता वाईट गोष्टींना सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे."
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मानधन कपातीस तयार - हेजलवूड
ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पैशांची कमतरता असल्याचे वृत्त आहे. हेजलवूड म्हणाला, ''यामुळे मला थोडा धक्का बसला. फुटबॉल हंगाम सुरू झाला असताना हा साथीचा रोग पुढे आला. आम्ही चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत. आता वाईट गोष्टींना सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे."
हेजलवूड पुढे म्हणाला, ''आम्ही इतर खेळांपेक्षा वेगळे नाही. मात्र, ही परिस्थिती किती वेळ असेल यावर सर्वकाही अवलंबून आहे. पुढच्या उन्हाळ्यापर्यंत अशी परिस्थिती राहिली तर नक्कीच ही गंभीर बाब आहे.''