लंडन- कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे आयसीसीने खेळाडूसाठी कडक नियमावली तयार केली आहे. यात चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान, चेंडूला सॅनिटायझर लावल्याने, एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे निलंबन करण्यात आले आहे.
गोलंदाज कोरोनाच्या आधी चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करत असतं. पण कोरोनाच्या धोक्यामुळं आयसीसीने लाळ किंवा घाम याचा वापर करण्यास मज्जाव केला आहे.
इंग्लंडमध्ये बॉब विलिस ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिच क्लाडॉन ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. त्याने एका सामन्यात चेंडूला चमकवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे क्लबने त्याचं निलंबन करत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.