हैदराबाद -जेव्हा क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांची चर्चा असते तेव्हा सर डॉन ब्रॅडमनचे नाव हमखास घेतले जाते. क्रिकेट विश्वात अनेक विक्रम रचणाऱ्या ब्रॅडमन यांनी २५ फेब्रुवारी २००१ म्हणजेच १९ वर्षांपूर्वी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी २० वर्ष राज्य केलं. ब्रॅडमननंतर अनेक फलंदाज क्रिकेट क्षेत्रात यशस्वी झाले मात्र, त्यांचे काही विक्रम आजही अबाधित राहिले आहेत.
फलंदाजीत ९९ पेक्षा जास्त सरासरी -
सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या. अनेक फलंदाजांनी त्यांची ही धावसंख्या नंतर ओलांडली असली तरी, आजवर एकाही फलंदाजाने त्यांच्या 'अद्भूत' सरासरीला स्पर्श केलेला नाही. ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत १९ शतके ठोकली. १९३० रोजी इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दौऱ्यात त्यानी वैयक्तिक ३३४ धावांचा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम नंतर मोडला गेला, पण त्यावेळी डावात त्रिशतक झळकावणं एखाद्या स्वप्नासारखं होतं. १९३४ मध्ये त्यांनी इंग्लंडविरूद्ध परत एकदा त्रिशतक झळकावलं.
अवघ्या तीन षटकांत ठोकलं शतक -
तीन षटकात शतक हे आजच्या वेगवान क्रिकेटजगात स्वप्नासारखंच भासतं. मात्र, ही किमयादेखील ब्रॅडमन यांनी ८९ वर्षांपूर्वी करून दाखवली. त्यांनी या खेळीत १४ षटकार आणि २९ चौकारांसह एकूण २५६ धावा केल्या होत्या.
'नाईटहूड'चा किताब -