महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसुंदरीचा होणार घटस्फोट - ellyse perry decided to separate

पेरी आणि टूमुआ यांनी ऑगस्ट 2014 मध्ये साखरपुडा केला होता, तर डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. फेब्रुवारी महिन्यातील ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमात पेरी जेव्हा लग्नाच्या अंगठीशिवाय दिसली तेव्हा ती आणि टूमुआ यांच्यातील वादाविषयी चर्चा झाली होती. पेरीने तिसऱ्यांदा बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला आहे.

australian cricketer ellyse perry and matt toomua have decided to separate
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसुंदरीचा होणार घटस्फोट

By

Published : Jul 27, 2020, 3:19 PM IST

सिडनी -ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची खेळाडू एसिल पेरी आणि रग्बी खेळाडू मॅट टूमुआ विभक्त होणार आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या वृत्तानुसार, ''आम्ही या वर्षाच्या सुरुवातीस एकमेकांचा पूर्ण आदर ठेवून विभक्त होण्याचे ठरवले आहे. वेगळे होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि आपले सध्याचे जीवन पाहता ते एकमेकांच्या हिताचे आहे. परस्पर कराराच्या आधारे घेतलेला हा निर्णय आहे", असे दोघांनी सांगितले.

एसिल पेरी आणि मॅट टूमुआ

पेरी आणि टूमुआ यांनी ऑगस्ट 2014 मध्ये साखरपुडा केला होता. तर, डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. फेब्रुवारी महिन्यातील ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमात पेरी जेव्हा लग्नाच्या अंगठीशिवाय दिसली तेव्हा ती आणि टूमुआ यांच्यातील वादाविषयी चर्चा झाली होती. पेरीने तिसऱ्यांदा बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला या जोडीने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांना नकार दिला असला तरी, बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकल्यानंतर पेरीने आपल्या भाषणात टूमुआचा उल्लेख न केल्याने या दोघांमधील संघर्ष उघडकीस आला होता.

यावर्षी मार्चमध्ये महिला टी-20 वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाची पेरी खेळाडू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details