अॅडलेड -ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकीपटू अॅस्टन एगर मार्श एकदिवसीय चषक स्पर्धेदरम्यान गंभीर जखमी झाला. दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान एगर आपला भाऊ वेस एगरचा झेल पकडत असताना जखमी झाला.
हेही वाचा -बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट

या सामन्यादरम्यान झेल पकडताना एगरचा तोल गेला आणि चेंडू थेट त्याच्या नाकावर जाऊन आदळला. लगेचच फलंदाजी करणारा अॅस्टन एगरचा भाऊ वेस एगर त्याच्याकडे धावत आला. जेले रिचर्डसनने त्वरित वैद्यकीय टीमला मैदानावर बोलावले. या अपघातामुळे एगरच्या नाकातून रक्त येऊ लागले होते.
'तो मैदानावर कोसळला तेव्हा त्याचा चष्मादेखील फुटला. या अपघातामुळे मला खूप वाईट वाटत आहे. पण, आता तो सुखरूप आहे.', असे वेस एगरने या घटनेनंतर म्हटले आहे.