महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्टार्कच्या बायकोचा विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद १४८ धावा!

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात अ‍ॅलिसाने ६१ चेंडूंत नाबाद १४८ धावा ठोकल्या. या खेळीमध्ये तिने तब्बल १९ चौकार व ७ षटकार खेचत लंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्याच मेग लॅनिंगने इंग्लंड विरुद्ध नाबाद १३३ केल्या होत्या. आता तिचाच विक्रम अ‍ॅलिसाने मोडला आहे.

स्टार्कच्या बायकोचा विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकल्या १४८ धावा!

By

Published : Oct 2, 2019, 1:47 PM IST

नवी दिल्ली -आस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भल्याभल्या फलंदाजांना घायाळ करणाऱ्या स्टार्कच्या पत्नीने म्हणजेच अ‍ॅलिसा हिलीने नुकताच एक विश्व विक्रम प्रस्थापित केला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या अ‍ॅलिसाने श्रीलंकाविरुद्ध महिला टी-२० सामन्यात गोलंदाजांची पिसे काढली.

हेही वाचा -कपिल देव यांनी दिला सीएसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात अ‍ॅलिसाने ६१ चेंडूंत नाबाद १४८ धावा ठोकल्या. या खेळीमध्ये तिने तब्बल १९ चौकार व ७ षटकार खेचत लंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्याच मेग लॅनिंगने इंग्लंड विरुद्ध नाबाद १३३ केल्या होत्या. आता तिचाच विक्रम अ‍ॅलिसाने मोडला आहे.

मिचेल स्टार्क आणि अ‍ॅलिसा हिली

शिवाय, महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये यष्टिरक्षक म्हणूनही अ‍ॅलिसाने एक विक्रम केला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिने न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला पछाडले आहे. २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध मॅक्क्युलमने १२३ धावांची खेळी केली होती.

अ‍ॅलिसाच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने लंकेसमोर २ बाद २२६ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात लंकेचा संघ २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात ९४ धावाच करु शकला.

ABOUT THE AUTHOR

...view details