लंडन - लॉर्ड्स मैदानावर अॅशेस मालिकेतील दुसरा करोटी सामना रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावामध्ये सर्वबाद २५८ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १०२ झाली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो फलंदाजी करत असताना जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक चेंडू थेट त्याच्या मानेवर आदळला. त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
नेमके काय घडले -
दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्मिथ १५२ चेंडूत ८० धावांवर खेळत होता. तेव्हा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर ७७ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसरा चेंडू त्याने बाउंसर टाकला. हा चेंडू स्मिथच्या हेल्मेटच्या उजव्या बाजूला त्याच्या मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथ वेदनेने मैदानातच कोसळला.