सिडनी- ऑस्ट्रेलियाची स्थानिक क्रिकेट स्पर्धा शेफिल्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेत फलंदाज विचित्र पद्धतीने बाद झाला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हिल्टन कार्टराईट याने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटवर जोरदार आदळला. लार्किन हेल्मेटमुळे बचावला खरा परंतु, हेल्मेटला चेंडू लागून हवेत उडाला. गोलंदाज जेसन संघाने हा झेल पकडल्यामुळे हिल्टन कार्टराईटला बाद देण्यात आले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि सिडनी न्यू साउथ वेल्स यांच्यात सामन्यातील चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. या घटनेनंतर क्षेत्ररक्षकला तपासण्यासाठी फिजीओ आणि इतर कर्मचारी मैदानात दाखल झाले. परंतु, क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.