नवी दिल्ली - टी-२० तिरंगी मालिकेत एलिस पेरीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला क्रिकेट संघाला मात दिली. रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला.
तिरंगी टी-२० मालिका : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ४ गडी राखून विजय
भारताने पहिल्या सामन्या इंग्लंडला धूळ चारुन विजयी सुरूवात केली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १०३ धावा केल्या होत्या. स्मृती मानधना (३५), हरमनप्रीत कौर (२८) आणि राधा यादव (११) या तिघी सोडल्यास अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारुन विजयी सुरूवात केली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १०३ धावा केल्या होत्या. स्मृती मानधना (३५), हरमनप्रीत कौर (२८) आणि राधा यादव (११) या तिघी वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताचे १०४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पेरीने गोलंदाजीत १३ धावांमध्ये ४ गडी बाद केले. तर फलंदाजीत तिने ४९ धावांचे महत्वपूर्ण खेळी केली. भारताकडून राजश्री गायकवाडने २, शिखा पांडे, दीपा शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. एलिस पेरी सामनावीर ठरली.