बर्मिंघहॅम- अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर २५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हिरो ठरला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव स्मिथ. स्मिथने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली. त्याने पहिल्या डावात १४४ तर दुसऱ्या डावात १४२ धावा केल्या. स्मिथच्या या कामगिरीवर संघाचा कर्णधार टिम पेनने खूश होत प्रतिक्रिया दिली.
स्मिथची भन्नाट कामगिरी..! कौतुकासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, कर्णधार पेन खुश - batsman
सामना संपल्यानंतर पेन म्हणाला की, स्टिव स्मिथने केलेल्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. मी पाहिलेली आतापर्यंतची ही सर्वांत चांगली कामगिरी आहे. स्मिथच्या या कामगिरीने त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

पुढे बोलताना पेन म्हणाला, पाच दिवसीय सामन्यात प्रत्येक दिवशी चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्यावर दबाव असतो. या सामन्यात आम्ही कायम विरोधी संघावर दबाव निर्माण केला होता. यामुळे आम्ही सामना जिंकण्यात यशस्वी ठरलो. दरम्यान, स्टिव स्मिथने चेंडू छेडछाड प्रकरणात १६ महिन्याची शिक्षा भोगून संघात परतला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने दोन्ही डावात शतकी खेळी करुन त्याने आपली प्रतिक्षा सिध्द केली आहे.