सिडनी - पाकिस्तानचे युवा वेगवान गोलंदाज कसोटी मालिकेत डोकेदुखी ठरु शकतात, याची कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने दिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात गुरुवार पासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला तोंड देण्यासाठी आम्ही खास रणणिती आखत असल्याचे पेन म्हणाला.
पाकिस्तानचा १६ वर्षीय गोलंदाज नसीम शाह यांच्या भेदक गोलंदाजीची चर्चा सद्या क्रिकेट विश्वात रंगली आहे. शाह याच्यासोबत १९ वर्षीय शाहीन अफ्रिदी आणि मूसा खान यांनीही आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. या त्रिकूटामुळे ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत अडचणीत येऊ शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे.
पाकच्या त्रिकूटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने खास रणणिती आखली आहे. तो सद्या शाह, अफ्रिदी आणि खान यांच्या गोलंदाजीचे व्हिडिओ पाहत आहे. याविषयी बोलताना पेन म्हणाला, 'आम्ही पाकच्या वेगवान माऱ्याला तोंड देण्यासाठी तयार आहोत. पाकच्या युवा गोलंदाजीत वेग आणि विविधता आहे. पण आम्ही त्याचा मारा खेळून काढू.'