महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकला १० गड्यांनी धूळ चारून ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १२ वर्षानंतर 'असं' घडलं..! - क्रिकेट विषयी लेटेस्ट बातम्या

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ १०७ धावांवर आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (४८) आणि अॅरोन फिंच (५२) यांनी नाबाद भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला.

पाकला १० गड्यांनी धूळ चारून ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १२ वर्षानंतर 'असं' घडलं..!

By

Published : Nov 9, 2019, 11:10 AM IST

पर्थ - यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दची ३ सामन्यांच्या टी-२० मालिका २-० ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. दरम्यान, २०१९ या वर्षात ऑस्ट्रेलियाच्या संघाने अद्याप एकही टी-२० सामना गमावलेला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने तब्बल १२ वर्षानंतर विरोधी संघावर १० गडी राखून मात केली आहे.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ १०७ धावांवर आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (४८) आणि अॅरोन फिंच (५२) यांनी नाबाद भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तान विरुध्दची टी-२० मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयी संघ

महत्वाची बाब म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल १२ वर्षानंतर १० गडी राखून विजय मिळवला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००७ सालच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुध्दचा सामना १० गडी राखून जिंकला होता. या सामन्यात सलामीवीर कर्णधार अॅरोन फिंचच्या नेतृत्वात खेळताना मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलक्रिस्ट यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात लंकेने दिलेले १०२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने बिनबाद १०.२ षटकात पूर्ण केले होते.

कर्णधार अॅरोन फिंचच्या मार्गदर्शनात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०१९ मध्ये अद्याप ८ सामने जिंकले आहेत. २०१० नंतर ऑस्ट्रेलिया संघाचे हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने ८ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ७ जिंकले आहेत एक सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.

हेही वाचा -VIDEO: धवनने केली अक्षयच्या 'बाला'ची अ‌‌ॅक्टिंग, भुवी म्हणाला..तू आहेसच विसरभोळा

हेही वाचा -ये पठाण के हाथ हैं ठाकुर..! यूसुफ पठाणच्या शानदार झेलवर राशिद खानची मजेशीर कमेंट

ABOUT THE AUTHOR

...view details