सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये रंगला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांत आटोपल्यानंतर भारतीय फलंदाजीदरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. यामुळे त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात दाखल नेण्यात आले आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. ऑस्ट्रेलियाचे वेगवान त्रिकूट पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे भारतीय फलंदाजांविरूध्द बाऊंसरचा मारा करत होते. यादरम्यान, पॅट कमिन्स फेकलेला चेंडूचा ऋषभ पंतला अंदाज आला नाही. पंतला हा चेंडू बाऊन्सर येईल असे वाटले. मात्र चेंडूने उसळी न घेतल्यामुळे तो पंतला लागला. यात पंतच्या डाव्या कोपऱ्याला जोराचा मार बसला. पंतला झालेल्या दुखापतीमुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पंतने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. तो हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.