महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WC2019 : वेस्टइंडीज आणि द. आफ्रिकेला पराभवाचे पाणी पाजणाऱ्या बांगलादेशसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान - Cricket World Cup

ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

वेस्टइंडीज आणि द. आफ्रिकेला पराभवाचे पाणी पाजणाऱ्या बांगलादेशसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान

By

Published : Jun 20, 2019, 1:18 PM IST

नॉटिंगहॅम - गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आज विश्वकरंडक स्पर्धेमध्ये ट्रेंट ब्रिज मैदानावर गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये ४ सामन्यात विजय मिळवत ८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तर बांगलादेशचा संघ ५ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियन संघात कर्णधार अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा असे दिग्गज फलंदाज आहेत. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन कॉल्टर नाईल आणि केन रिचर्डसन यासांख्या दमदार गोलंदाजांचा ताफा असल्याने ऑस्ट्रेलियाकडे या विश्वकरंडकातील एक बलाढ्य आणि संतुलित संघ म्हणून पाहिले जात आहे.

दुसरीकडे बांगलादेश संघाने या विश्वकरंडकात वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिकेसारखे बलाढ्या संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे कांगारू बांगलादेशला हलक्यात घेणार नाही. या पूर्ण स्पर्धेत दमदार फलंदाजी करणारा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर बांगलादेशची मुख्य मदार असेल. शाकिबने आतापर्यंत ४ सामने खेळताना २ शतके आणि २ अर्धशतकांच्या ३८४ धावा केल्या आहेत. तर मुशफिकर रहीम, तमीम इक्बाल आणि मश्रफे मोर्तझा यांच्याकडून बांगलादेशला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

असे आहेत दोन्ही संघ

  • ऑस्ट्रेलिया -अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झॅम्पा.
  • बांगलादेश -मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.

ABOUT THE AUTHOR

...view details