लंडन- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळवली जाणारी प्रतिष्ठित अॅशेस मालिका काल (गुरूवार) पासून सुरू झाली. अॅशेस मालिका यावर्षी इंग्लंडमध्ये होत असून, बर्मिंगहॅम येथे मलिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
अॅशेस मालिका : पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया सर्वबाद 284 तर इंग्लंड नाबाद 10 धावांवर - landon
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या २ षटकांत नाबाद १० धावा झाल्या होत्या. इंग्लंड अजूनही २७४ पिछाडीवर खेळत आहे.

या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या २ षटकांत नाबाद १० धावा झाल्या होत्या. इंग्लंड अजूनही २७४ पिछाडीवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कांगारूंचा डाव गडगडला. सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने पीटर सिडलला सोबत घेत संघाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात स्मिथने चोविसावे कसोटी शतक झळकावले.