महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान वॉटरबॉय

कॅनबरात प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन स्वत: ड्रिंक्स घेऊन मैदानावर पोहचले. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात..

By

Published : Oct 25, 2019, 3:17 PM IST

ऑस्ट्रेलिया -क्रिकेटमध्ये जेव्हा संघाचा मुख्य खेळाडू संघाबाहेर थांबून वॉटरबॉयचे काम करत असतो, तेव्हा सर्वांनाच नवल वाटते. आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंविषयी अशा घटना घडलेल्या आहेत. मग तो खेळाडू धोनी असो वा विराट कोहली. मात्र, एका देशाचे पंतप्रधान वॉटरबॉयचे काम करत असतील तर?

हेही वाचा -विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत, पाकिस्तान वेगवेगळ्या गटात

हो. असाच एक प्रकार श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यात घडला. कॅनबरात प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन स्वत: ड्रिंक्स घेऊन मैदानावर पोहचले. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

२७ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी, लंका आणि प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात सराव सामना झाला. यावेळी लंकेचा फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन आले.

प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाने मिळवला विजय -

प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सराव सामन्यात प्राइम मिनिस्टरने एक गडी राखून विजय मिळवला. लंकेने पहिल्यांदा खेळताना ८ बाद १३० धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना प्राइम मिनिस्टर इलेव्हनकडून हॅरि नेल्सनने ५० चेंडूत ७९ धावांची आतषबाजी खेळी केली. लंकेकडून ओशादा फर्नांडोने सर्वाधिक ३८ धावा केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details