मेलबर्न -ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सोमवारी या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघांची घोषणा केली. या संघामध्ये भारताच्या फक्त एकाच खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहलीची या संघात निवड झाली असून त्याच्याकडे या संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा -कोहलीने पुसला 'तो' कलंक, वाचा नक्की काय होती घटना
ऑस्ट्रेलियाच्या या संघात इंग्लंडचे चार, न्यूझीलंडचे दोन, दक्षिण आफ्रिकेचे दोन आणि ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू आहेत.
असा आहे हा संघ -
- सलामीवीर :अॅलिस्टर कुक आणि डेव्हिड वॉर्नर
- मधल्या फळीतील फलंदाज :केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली (कर्णधार)
- यष्टीरक्षक : एबी डिव्हिलियर्स
- अष्टपैलू खेळाडू : बेन स्टोक्स
- गोलंदाज : डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि नॅथन लायन