महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WHAT A COMEBACK!.. स्मिथने टीम इंडियाच्या कर्णधाराला मागे टाकत रचला खास विक्रम - स्मिथ

अॅशेसमध्ये ९वे शतक साकारणाऱ्या स्मिथने कमी डावात २४ शतके साकारण्याचा विक्रम केला आहे.

WHAT A COMEBACK!.. स्मिथने टीम इंडियाच्या कर्णधाराला मागे टाकत केला खास विक्रम

By

Published : Aug 2, 2019, 1:16 PM IST

लंडन -प्रतिष्ठित अॅशेस मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. बर्मिंगहॅमला रंगणाऱ्या या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी स्विकारली. आणि त्यांनी सर्वबाद २८४ धावा केल्या. सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने पीटर सिडलला सोबत घेत संघाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात स्मिथने चोविसावे कसोटी शतक झळकावत विराट कोहलीचा विक्रम मोडित काढला.

अॅशेसमध्ये ९वे शतक साकारणाऱ्या स्मिथने कमी डावात २४ शतके साकारण्याचा विक्रम केला आहे. या आधी कोहलीने १२३ डावांत २४ शतके झळकावली होती. स्मिथने आता ११८ डावातच २४व्या शतकाला गवसणी घातली आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने १२५, सुनील गावस्करने १२८, तर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने १३२ डावात २४ शतके पूर्ण केली आहेत.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी ६६ डावांतच २४ शतके साकारण्याची किमया केली होती. चेंडूशी छेडछाड केल्याने, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, डेव्हिड वार्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट आणि स्टिव स्मिथ यांच्यावर १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिघांनी परत कसोटी संघात जागा मिळवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details