मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने श्रीलंकेविरुध्दचा तिसरा एकदिवसीय सामना ९ गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मालिका विजयासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १८ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर चमारी अटापट्टूच्या १०३ धावांच्या जोरावर लंकेने निर्धारीत ५० षटकात ८ बाद १९५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य २६.५ षटकात १ गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. एलिसा हिलीने नाबाद ११२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.