महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अजब कसोटी सामना : दोन्ही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह मैदानात

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात पर्थ येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून या कसोटीवर पहिल्या दिवसापासून यजमान संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दरम्यान, प्रत्येकी ११ खेळाडूंसह खेळला जाणारा क्रिकेटचा सामना दोन्ही संघ १०-१० खेळाडूंसह खेळत आहेत.

australia and new zealand team play with 10 players in perth test
अजब कसोटी सामना : दोन्ही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह मैदानात

By

Published : Dec 14, 2019, 5:17 PM IST

पर्थ- क्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. मात्र, सध्या एक असा सामना सुरू आहे ज्यात एक नव्हे तर दोनही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह सामना खेळत आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात पर्थ येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून या कसोटीवर पहिल्या दिवसापासून यजमान संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. दरम्यान, प्रत्येकी ११ खेळाडूंसह खेळला जाणारा क्रिकेटचा सामना दोन्ही संघ १०-१० खेळाडूंसह खेळत आहेत.

सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे प्रत्येकी एक खेळाडू जखमी झाल्यामुळे दोनही संघ प्रत्येकी १० खेळाडूंसह कसोटी खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज जॉश हेझलवूड आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन हे दोन्ही खेळाडू बाहेर गेले आहेत.

हेजलवुडला दुसऱ्या दिवशी दुखापत झाली. त्याचे स्नायू दुखावल्याने, तो उर्वरीत सामना खेळू शकत नाही, असे ट्विट आयसीसीने केले आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन जखमी झाला. तोही हा उर्वरीत सामना खेळू शकणार नाही.

हेजलवुडची दुखापत गंभीर असल्याचे कळते. यामुळे तो बॉक्सिंग डे आणि न्यू इयर या दोन्ही कसोटी खेळू शकणार नाही, असे समजते. दुसऱ्या कसोटीपर्यंत जर हेजलवुड बरा झाला नाही तर त्याच्या जागी जेम्स पॅटिंसन किंवा मायकल नसीर यापैकी एकाला संधी मिळू शकते.

हेही वाचा -Aus vs NZ : भिरकवलेली टोपी पंचांनी हवेत झेलली, पाहा स्मिथ आणि दार यांच्यातील मजेशीर सामना

हेही वाचा -VIDEO : हवेत 'सूर' मारुन स्मिथने घेतला अप्रतिम झेल, फलंदाज चक्रावला

ABOUT THE AUTHOR

...view details