लंडन - ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस विश्वकरंडकातील पुढील सामने खेळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाकिस्तान विरुध्दच्या झालेल्या सामन्यात स्टॉयनिसला दुखापतीमुळे खेळवण्यात आले नव्हते. यामुळं विश्वकरंडकातील उर्वरित सामन्यात स्टॉयनिस खेळणार की नाही यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
WC २०१९ : ऑस्ट्रेलियाला धक्का... 'हा' अष्टपैलू खेळाडू दुखापतीनं जायबंदी - विश्वकरंडक२०१९
स्टॉयनिसच्या दुखापतीची तपासणी झाल्यानंतरच तो सामना खेळू शकणार की नाही? हे स्पष्ट होईल. दुखापत जर गंभीर असल्यास स्टॉयनिसचा विश्वचषकातील उर्वरित सामन्यासाठी मुकावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा आज शनिवारी श्रीलंका संघाविरुध्द सामना होत आहे. या सामन्यात स्टॉयनिसला खेळवण्यात आलेले नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना बांग्लादेश विरुध्द नॉटिंघम येथे होणार आहे. या सामन्यासाठी स्टॉयनिस नॉटिंघमला पोहोचला आहे. मात्र, स्टॉयनिसच्या दुखापतीची तपासणी झाल्यानंतरच तो सामना खेळू शकणार की नाही? हे स्पष्ट होईल. दुखापत जर गंभीर असल्यास स्टॉयनिसचा विश्वचषकातील उर्वरित सामन्यासाठी मुकावे लागणार आहे.
शुक्रवारी झालेल्या सरावादरम्यान, स्टॉयनिसने भाग घेत सराव केला होता. याविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याने सांगितलं की, स्टॉयनिसला दुखापत झाल्याने मार्शला पाचारण करण्यात आले आहे. जर स्टॉयनिसची दुखापत गंभीर असल्यास मार्शची निवड करण्यात येणार असून तो चांगले प्रदर्शन करेल, अशी आशा त्याने बोलताना व्यक्त केली आहे. दरम्यान, स्टॉयनिसने विश्वकरंडक स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली नाही. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत १९ धावा करत ४ विकेट मिळवल्या आहेत.