अॅडलेड- ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने अॅडलेड कसोटीत खेळताना एक अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने कसोटीत सर्वात जलद ७ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला. स्टिव्ह स्मिथने ७० कसोटी सामन्यात १२६ डावांमध्ये खेळताना ७ हजारी पार केली. यापूर्वी १९४६ साली इंग्लंडच्या वाल्टर हॅमोंड यांनी १३१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
सर्वात जलद ७ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मिथने सचिन तेंडुलकर, विराट कोहली विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे. पाकिस्तान विरुध्दच्या दुसऱ्या सामन्याआधी स्मिथने ६९७७ धावा केल्या होत्या. त्याला ७ हजार धावा पूर्ण करण्यासाठी २३ धावांची गरज होती. या धावा त्याने डेव्हिड वॉर्नरसोबतीने जमवल्या आणि अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.