सुरत- भारतीय महिला क्रिकेटपटूचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल बेदाडे यांची महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई बडोदा क्रिकेट संघटनेने (बीसीए) केली आहे. 'बीसीए'चे सचिव अजित लेले यांनी पीटीआयला ही माहिती दिली.
अतुल बेदाडे यांच्यावर महिला क्रिकेटपटूबरोबर गैरप्रकार केल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. बेदाडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोपानंतर बडोदा क्रिकेट मंडळाने बेदाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता मात्र त्यांच्यावरील निलंबन हटवण्यात आले असली तरी त्यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली.