माद्रिद -स्पॅनिश क्लब अॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक डिएगो सिमोन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. क्लबने याबाबत माहिती दिली. सिमोन यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. सध्या ते घरी क्वारंटाइन आहेत, असे २०१३-१४मध्ये ला-लीगा विजेतेपद जिंकणार्या अॅटलेटिको माद्रिदने सांगितले.
अॅटलेटिको माद्रिदच्या प्रशिक्षकाला कोरोनाची लागण
अॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक डिएगो सिमोन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अॅटलेटिको माद्रिद हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब असून १९०३ साली या क्लबची स्थापना झाली. अॅटलेटिको माद्रिद हा रियाल माद्रिद आणि एफ. सी. बार्सिलोना यांच्या खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.
"शुक्रवारी संपूर्ण संघाची चाचणी घेण्यात आली. ज्यात संघाच्या व्यवस्थापकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला'', असे संघाने एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले. नवीन श्रेणीत स्थान मिळवणाऱ्या केडिज संघाविरूद्ध अॅटलेटिको माद्रिदला मैत्रीपूर्ण सामना खेळायचा आहे. त्यानंतर हा संघ २०२०-२१ हंगामात इंग्लंड प्रीमियर लीगचा पहिला सामना ग्रेनांडाविरुद्ध खेळणार आहे. २७ सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येईल.
अॅटलेटिको माद्रिद हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब असून १९०३ साली या क्लबची स्थापना झाली. अॅटलेटिको माद्रिद हा रियाल माद्रिद आणि एफ. सी. बार्सिलोना यांच्या खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे. या क्लबने ला-लीगाची ९ विजेतेपदे तर ८ उपविजेतेपदे जिंकली आहेत.