महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2019, 4:02 PM IST

ETV Bharat / sports

आशिया चषक : एकही चेंडू न खेळता भारतीय संघ अंतिम फेरीत

आशिया चषकात पावसामुळे उपांत्य फेरीचे दोन्ही सामने रद्द झाले आणि साखळी फेरीच्या कामगिरीच्या जोरावर भारत आणि बांगलादेशने अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात १५ सप्टेंबरला सामना रंगणार आहे.

आशिया चषक : एकही चेंडू न खेळता भारतीय संघ अंतिम फेरीत

कोलंबो - आशिया चषक २०१९ च्या स्पर्धेमध्ये भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने अंतिम फेरी गाठली आहे. यजमान श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तरीही भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताला विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात बांगलादेशविरुध्द खेळावे लागणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामनाही पावसामुळे रद्द झाला. यामुळे बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.

हेही वाचा -U-१९ Asia Cup : भारताचा पाकिस्तानवर विजय, मुंबईच्या अथर्व अंकोलेकरची चमकदार कामगिरी

कोलंबोमध्ये १९ वर्षाखालील संघामध्ये आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे गट साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर भारत आणि बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.

हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस

स्पर्धेत भारतीय संघाचा अ गटामध्ये समावेश होता. या गटातून भारतीय संघाने तीनही सामने जिंकून ६ गुणांसह अ गटात अव्वल स्थान पटकावले होते. तर बांगलादेशचा समावेश ब गटामध्ये होता. बांगलादेशनेही तीनही सामने जिंकून ब गटात अव्वल स्थान गाठले होते.

पावसामुळे उपांत्य फेरीचे दोन्ही सामने रद्द झाले आणि साखळी फेरीच्या कामगिरीच्या जोरावर भारत आणि बांगलादेशने अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात १५ सप्टेंबरला सामना रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details