मुंबई - भारताला १९ वर्षांखालील (Under १९) आशिया चषक पटकावून देणारा मराठमोळा क्रिकेटपटू अथर्व अंकोलेकर याचे अंधेरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजयी मिरवणुकीत ढोल-ताश्याच्या गजरात अथर्वसोबत त्याच्या आईनेही ठेका धरला.
रविवारी आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुध्द बांगलादेश या संघामध्ये पार पडला. हा सामना रोमांचक ठरला. भारताने या सामन्यात ५ धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात अथर्वने चमकदार कामगिरी करत २८ धावांमध्ये ५ गडी बाद केले.
मुंबईत परतल्यानंतर अथर्वचे जंगी स्वागत... हेही वाचा - चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो
मायदेशी परतल्यानंतर अथर्व राहत असलेल्या अंधेरी पूर्वेकडील प्रकाशवाडीत मोठ्या प्रमाणात जल्लोषात करण्यात आला. मित्रमंडळींनी अथर्वची थाटामाटात विजयी मिरवणूक काढली. त्याला खांद्यावर बसवून नाचवले.
कोलंबोमध्ये भीम पराक्रम केलेल्या अथर्व अंकोलेकर याने अतिशय हलाकीच्या स्थितीत प्राविण्य मिळवले आहे. त्याच्या बाबांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, त्यानंतर अथर्वची आई वैदेही अंकोलेकर यांनी अथर्वचा सांभाळ केला. त्या बेस्ट परिवहनमध्ये बसवाहक म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा -पंत खेळात सुधारणा कर, अन्यथा... रवी शास्त्रींची वॉर्निंग
दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १०६ धावा केल्या होत्या. मात्र, अथर्वने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला. अथर्वच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.