मुंबई - आयपीएल २०२१ च्या हंगामातील दुसरा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन याला एक मोठा विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.
ऑलओव्हर टी-२० क्रिकेटमध्ये २५० गडीचा टप्पा गाठण्यासाठी अश्विनला २ गडीची गरज आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील २४७ सामन्यात २४८ खेळाडूंना बाद केले आहे. ३४ वर्षीय अश्विनने २००७ मध्ये आंध्राविरोधात पहिला टी-२० पदार्पणाचा सामना खेळला होता. तर २०१० मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून डेब्यू केला.
अश्विन २००९च्या आयपीएल हंगामात सीएसकेसाठी पहिला सामना खेळला. तो चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला आहे.