महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमी भारतासाठी निर्णायक ठरेल - आशिष नेहरा - India

मोहम्मद शमी हा आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी निर्णायक कामगिरी करेल

Ashish Nehra

By

Published : Mar 5, 2019, 12:02 AM IST

मुंबई - जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ सध्या सर्वच प्रकारात चमकदार कामगिरी करतोय. त्यामुळे भारताचा संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जातोय. इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.

विश्वचषकाला आता थोडाच अवधी बाकी राहीला आहे. त्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला प्रश्न विचारण्यात आला, की कोणता भारतीय गोलंदाज या विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी निर्णायक ठरेल? त्यावर उत्तर देताना नेहरा म्हणाला की, मोहम्मद शमी हा आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी निर्णायक कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.

शमीने गेल्या काही महिन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघातील अव्वल दर्जाच्या गोलंदाजाच्या यादित मोहम्मद शमीने आपले स्थान निर्माण केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details