महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'इतना गलत कैसै हो सकता है भाई', पंच विल्सन सोशल मीडियावर ट्रोल - विल्सन सोशल मीडियावर ट्रोल

पंच विल्सन यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

'इतना गलत कैसै हो सकता है भाई', पंच विल्सन सोशल मीडियावर ट्रोल

By

Published : Aug 6, 2019, 7:23 PM IST

लंडन -कसोटीतील महत्वाची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या अॅशेसच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २५१ धावांनी पराभव केला. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या इंग्लंडला हरवल्याबद्दल ऑस्ट्रेलिया संघाची सर्वच स्तरावर चर्चा होत आहे. मात्र, त्याबरोबर या सामन्याचे पंच जोएल विल्सन यांचीही खूप चर्चा होत आहे.

पंच विल्सन यांनी दिलेल्या चूकीच्या निर्णयामुळे ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या सामन्यामध्ये पंचांनी एकूण १५ चूका केल्या. त्यामध्ये एकट्या विल्सन यांनी १० चूका केल्या आहेत. सामन्याच्या पाचव्या दिवशी विल्सन यांनी दोन मोठ्या चूका केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला त्यांनी बाद दिले. मात्र, फलंदाजांनी दोन्ही वेळेला रिव्हयू घेतला आणि ते रिव्हयू यशस्वी ठरले.

धावफलक -

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) - २८४/१०
  • इंग्लंड (पहिला डाव) - ३७४/१०
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) - ४८७/७ घोषित
  • इंग्लंड (दुसरा डाव) - १४६/१०

ABOUT THE AUTHOR

...view details