मँचेस्टर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघामध्ये अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या सुरुवातीलाच दोन गडी बाद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. मात्र, चर्चा रंगली ती स्मिथने मारलेल्या कव्हर ड्राइव्हची.
अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम
डावाचा सुरुवातीला सलामीवीर डेव्हिड वार्नर खाते न उघडताच माघारी परतला. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने माघारी धाडले. त्यानंतर संघाची धावसंख्या २८ असताना, मार्कस हॅरिसही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर फुल्ल फार्मात असलेला मार्कस लाबुशेन आणि ऑस्ट्रेलिया संघाचा संकटमोचक स्मिथने डाव सावरला दोघांनी शतकी भागिदारी करत व्यक्तीगत अर्धशतके ठोकली. स्मिथने एक अविश्वसनीय शॉट खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मिथने खेळलेला जगावेगळा कव्हर ड्राइव्हचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO : 'हातात बॅट होती, षटकार मारले आता हातात तलवार आहे'..पाक क्रिकेटरचे चिथावणीखोर वक्तव्य
स्मिथने बेन स्टोक्सच्या चेंडूवर जमिनीवर पडून जगावेगळा कव्हर ड्राइव्ह मारला. दरम्यान, लाबुशेन आणि स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेर तीन विकेट गमावून 170 धावांवर मजल मारता आली.