महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वॉर्नरची 'भोपळा' हॅट्ट्रीक, स्टुअर्ट ब्रॉडने केली सहाव्यांदा शिकार - Stuart Broad gets David Warner record

ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या 'आऊट ऑफ फार्म' असल्याचे दिसत आहे. मालिकेतील ८ डावांमध्ये वॉर्नरने फक्त एकच अर्धशतकी खेळी केली आहे. सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर आता तो पुन्हा दुसऱ्या डावातदेखील शून्यावर बाद झाला आहे. दुसऱ्या डावात बाद झाला, तेव्हा वॉर्नर हसत मैदानाबाहेर गेला. यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वॉर्नरची 'भोपळा' हॅट्रीक, स्टुअर्ट ब्रॉडने केली 'डेव्हिड'ची सहाव्यांदा शिकार

By

Published : Sep 7, 2019, 9:47 PM IST

मँचेस्टर - इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया संघामध्ये अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगला आहे. स्टिव स्मिथने पहिल्या डावात झळकवलेल्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात वर्चस्व कायम ठेवले. मात्र, या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये पुन्हा 'फेल' ठरला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर.

ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या 'आऊट ऑफ फार्म' असल्याचे दिसत आहे. मालिकेतील ८ डावांमध्ये वॉर्नरने फक्त एकच अर्धशतकी खेळी केली आहे. सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर आता तो पुन्हा दुसऱ्या डावातदेखील शून्यावर बाद झाला आहे. दुसऱ्या डावात बाद झाला, तेव्हा वॉर्नर हसत मैदानाबाहेर गेला. यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

U-१९ Asia Cup : भारताचा पाकिस्तानवर विजय, मुंबईच्या अथर्व अंकोलेकरची चमकदार कामगिरी

डेव्हिड वॉर्नर हा सुरू असलेल्या मालिकेत स्टुअर्ट ब्रॉड करवी तब्बल सहा वेळा बाद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो ब्रॉडच्या गोलंदाजीवर पुन्हा पुन्हा बाद होत आहे आणि त्यापैकी तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे, कदाचित या असहायतेची एक झलकही त्याच्या हसण्यात दिसली. वॉर्नरची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या ६१ आहे. ही खेळी वगळता वॉर्नरला सामन्यात दुहेरी आकडादेखील ओलांडता आला नाही. त्याने मागील आठ डावांमध्ये २, ८, ३, ५, ६१, ०, ० आणि ० धावा केल्या आहेत.

गौतम गंभीर म्हणतो...संजू सॅमसन चंद्रावरही फलंदाजी करु शकतो

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आणि आयसीसी विश्वकरंडक २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details