लंडन- ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथने इंग्लंड विरुध्द अॅशेस मालिकेत दणकेबाज फलंदाजी केली आहे. स्टीव्ह स्मिथने या मालिकेत आतापर्यंत ७०० पार धावा केल्या आहेत. त्यांच्या या अफलातून फलंदाजीचे कौतूक तर क्रिकेट विश्वातून होतच आहे. पण, आता तो अप्रतिम झेल पकडल्याने प्रकाशझोतात आला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये अॅशेस मालिकेतील शेवटचा पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एका हाताने अप्रतिम झेल घेतला. स्मिथने घेतलेला झेल पाहून इंग्लंडचा फलंदाज ख्रिस वोक्स तर आर्श्चयचकित झालाच मात्र, त्यासोबत ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडूही स्मिथने पकडलेला झेल पाहून दंग झाले.
हेही वाचा -अॅशेस मालिका - डेन्लीचे शतक हुकले, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे ३८२ धावांची आघाडी