महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'अॅशेसमध्ये डेव्हिड वार्नर सपशेल 'फेल' ठरला तरी तो संघात असायला हवा' - ऑस्ट्रेलिया विरुध्द पाकिस्तान

पाकिस्तानविरुध्द २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात रिकी पाँटिंगने सांगितले की, 'वार्नर पाकविरुध्दच्या मालिकेत निश्चित संघात असायला हवा. इंग्लंडविरुध्दच्या शेवटच्या कसोटीतील दुसऱ्या डावातही तो शुन्य धावांवर जरी बाद झाला तरी, मला काही फरक पडत नाही. मात्र, तो संघात असायला हवा.'

'अॅशेसमध्ये डेव्हिड वार्नर सपशेल 'फेल' ठरला तरी तो संघात असायला हवा'

By

Published : Sep 15, 2019, 6:19 PM IST

लंडन - ऑस्ट्रेलियाचा संघ अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तानविरुध्द कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अॅशेसमध्ये सपशेल 'फेल' ठरलेला डेव्हिड वॉर्नरला संधी द्यायला आवडेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सांगितले आहे.

पाकिस्तानविरुध्द २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात रिकी पाँटिंगने सांगितले की, 'वार्नर पाकविरुध्दच्या मालिकेत निश्चित संघात असायल हवं. इंग्लंडविरुध्दच्या शेवटच्या कसोटीतील दुसऱ्या डावातही तो शुन्य धावांवर जरी बाद झाला तरी, मला काही फरक पडत नाही. मात्र, तो संघात असायला हवं.'

'वॉर्नर, स्मिथ, लॅब्युशेन हे खेळणं नक्की आहे. मात्र, मधल्या फळीतील मॅथ्यू वेड आणि ट्रेविस हेड याविषयी शशांकता आहे. टिम पेनला संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवायला हवे. पण संघाच्या बाबतीत मध्यल्या फळीमध्ये बदल करण्याविषयी विचार करण्यात यावा,' असे पाँटिंगने सांगितले.

हेही वाचा -अॅशेस: ऑस्ट्रेलिया ३९९ करुन इतिहास रचणार की, इंग्लंड मालिका बरोबरीत सोडवणार...वाचा काय म्हणतो रेकार्ड

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. मालिकेत वार्नर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर तब्बल ६ वेळा बाद झाला आहे. महत्वाचे म्हणजे, यात तो तीन वेळा भोपळाही फोडू शकलेला नाही.

हेही वाचा -अ‌ॅशेस मालिका - डेन्लीचे शतक हुकले, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे ३८२ धावांची आघाडी

ABOUT THE AUTHOR

...view details