सिडनी - इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया संघामध्ये प्रतिष्ठित अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात, पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलिया फलंदाज स्टिव स्मिथने धमाकेदार द्विशतक ठोकले. स्मिथची ही खेळी अॅशेस कसोटी सामन्यातील अलौकिक असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले आहे.
स्टिव स्मिथ हा चेंडू फेरफार प्रकरणात १२ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगल्यानंतर मैदानात परतला आहे. बंदीनंतर स्मिथ पहिलीचा अॅशेस मालिका खेळत आहे. त्याने या मालिकेत धावांचा पाऊस पाडला असून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात २११ धावांची नेत्रदीपक खेळी केली.
वॉर्नरची 'भोपळा' हॅट्ट्रीक, स्टुअर्ट ब्रॉडने केली सहाव्यांदा शिकार