लंडन - ओव्हलच्या मैदानात रंगलेला अखेरचा पाचवा कसोटी सामना इंग्लंडने १३५ धावांनी जिंकला. इंग्लंडच्या विजयात चमकला अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना जिंकला. या विजयाबरोबर इंग्लंडने अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सोडली आहे.
स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज हतबल ठरले. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर मार्कस हॅरिस (९) आणि डेव्हिड वार्नर (११) धावांवर बाद झाले. या दोघांचा बळी ब्रॉडने घेतला. त्यानंतर जॅक लेच याने मार्नस लाबुशेन याला १४ धावांवर बाद केले.
अॅशेस मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या स्टीव्ह स्मिथला अखेरच्या कसोटीतील दुसऱया डावात २३ धावांवर बाद झाला. स्मिथचा बळी ब्रॉडने घेतला. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १६७ धावा अशी झाली होती. तेव्हा मॅथ्यू वेडने शतकी खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ न मिळाली नाही. ब्रॉड आणि जॅक लेच यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले.
दरम्यान, इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरला आहे. मालिकेत ७७४ धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला 'मालिकावीर' पुरस्कार देण्यात आला. तर पाचव्या कसोटी सामन्यासाठी जोफ्रा आर्चरला 'सामनावीर' घोषित करण्यात आले.