महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्टिव्ह स्मिथ पुन्हा 'खलनायक', विजयी जल्लोषात केले 'हे' कृत्य

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा १८५ धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात जल्लोष तर केलात, त्याच दिवशी रात्री भरमैदानात बीअर पार्टी केली. या सेलिब्रेशन पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गाणी गायली आणि डान्सही केला. या पार्टीतही स्मिथ फुल्ल फॉर्मात होता. त्याने नॅथल लिऑन याच्यासोबत भन्नाट डान्स केले. तसेच यावेळी स्मिथने इंग्लंड गोलंदाज जॅक लीच याची खिल्ली उडवली.

स्टिव्ह स्मिथ पुन्हा 'खलनायक', विजयी जल्लोषात केले 'हे' कृत्य

By

Published : Sep 10, 2019, 7:45 PM IST

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन विवादात अडकलेला असतो. इंग्लंडविरुध्दच्या चौथ्या अॅशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने रात्री भरमैदानातच सेलिब्रेशनही केले. या दरम्यान, खेळाडूंनी बीअर प्यायली. बीअर प्यायल्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलियाई फलंदाज स्टिव्ह स्मिथने असे काही केले की, त्या कारणाने तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा १८५ धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात जल्लोष तर केलात, त्याच दिवशी रात्री भरमैदानात बीअर पार्टी केली. या सेलिब्रेशन पार्टीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गाणी गायली आणि डान्सही केला. या पार्टीतही स्मिथ फुल्ल फॉर्मात होता. त्याने नॅथल लिऑन याच्यासोबत भन्नाट डान्स केले. तसेच यावेळी स्मिथने इंग्लंड गोलंदाज जॅक लीच याची खिल्ली उडवली. सेलिब्रेशन दरम्यान, स्मिथने जॅक सारखा चष्मा घातला होता. त्याने हा चष्मा फॅशन म्हणून नाही, तर जॅकची खिल्ली उडवण्यासाठी घातला होता.

हेही वाचा -अॅशेस २०१९ : ऑस्ट्रेलियाच्या विजयात स्टिव्ह स्मिथसोबत गोलंदाजांचे योगदान - रिकी पाँटिंग

दरम्यान, हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्स आणि जॅक लीच या दोघांनी शेवटच्या गड्यासाठी ७६ धावांची भागिदारी रचत अविश्वसनीय सामना जिंकला होता. दोघांनी हा विजय ऑस्ट्रेलियाच्या घशातून ओढून आणला होता. या विजयानंतर स्टोक्सने जॅकला सांगितले होते की, तुला मी आयुष्यबर चष्मा पुरवत राहीन. या गोष्टीची खिल्ली स्मिथने यावेळी उडवल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा -'या' कारणामुळे कुलदीप, चहलला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून वगळले - प्रसाद

ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीमध्ये दणदणीत विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना १२ स्पटेंबरपासून ओव्हल येथे खेळविण्यात येईल. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details