लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आजपासून ऐतिहासिक अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. अॅशेज मालिका दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेची मानली जाते. आज बर्मिंगहॅम येथे अॅशेस मलिकेतील पहिल्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकण्याच्या उद्देशाने खेळ करेल तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विश्वकरंडकातील उपांत्य सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. अॅशेस मालिका यंदा इंग्लंडमध्ये होत असून ऑस्ट्रेलियाने मागील 18 वर्षांमध्ये एकदाही इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेली नाही. यामुळे यजमान संघाचे पारडे जड असल्याचे दिसून येते.
रेकार्ड पाहिल्यास आतापर्यंत दोन्ही संघामध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 33 मालिका जिंकल्या आहेत. तर इंग्लंडने 32 वेळा अॅशेसच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. राहिलेल्या 5 मालिका अनिर्णयीत सुटल्या आहेत. आज (गुरुवार) पासून सुरू होणारी प्रत्येक कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाही भाग असणार आहे. यामुळे विजयी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.
ऑस्ट्रेलियाचा संघ -