महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अॅशेस २०१९ : बेन स्टोक्सची कमाल..दे धमाल.. १३१ वर्षानंतर पहिल्यांदा अशी कामगिरी

अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ६७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या अविश्वसनीय खेळीने अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला. याआधी १३१ वर्षांपूर्वी १८८८ मध्ये ६७ पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

VIDEO अॅशेस २०१९ : बेन स्टोक्सची कमाल...दे धमाल...१३१ वर्षानंतर पहिल्यांदा अशी कामगिरी

By

Published : Aug 26, 2019, 1:10 PM IST

लीड्स -क्रिकेट विश्वामध्ये अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या अॅशेस मलिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने अविश्वसनीय विजय मिळवला. या विजयाचा 'किंगमेकर' ठरला तो बेन स्टोक्स. या पठ्ठ्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून विजय हिसकावून आणला. इंग्लंडने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

इंग्लंडला तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ६७ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत करत इंग्लंडसमोर ३५९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. दोन्ही सलामीवीर संघाची धावसंख्या १५ असताना तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार रुटने डाव सावरत ७७ धावा केल्या. त्याने डेनलीसोबत १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली.

दोघांची भागिदारी पाहून इंग्लंड विजय मिळणार असे वाटत होते. तेव्हा डेनली आणि रुट काही धावांच्या अंतरावर बाद झाले. संघाची अवस्था १५९ वर ४ बाद अशी झाली. त्यानंतर जॉनी बेअरस्टो ३६ धावा करत बाद झाला. तर, जॉस बटलर, ख्रिस वोक्स केवळ एक धाव करत बाद झाले. एकवेळ संघाची अवस्था ९ बाद २८६ अशी झाली. एकीकडे मैदानात नांगर टाकून उभा टाकलेला बेन स्टोक्सने अचानक 'गिअर' बदलला.

स्कोक्सने आक्रमक पावित्रा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले अन् अशक्य वाटणारा विजय मिळवला. दरम्यान, इंग्लंडचा डाव पहिल्या डाव अवघ्या ६७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला. याआधी १३१ वर्षांपूर्वी १८८८ मध्ये ६७ पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details