लंडन - प्रतिष्ठित अॅशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे. हा सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात येणार असून या सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीसाठी सलामीवीर जेसन रॉय आणि क्रेग ओवरटन याला अंतिम ११ मध्ये जागा देण्यात आलेली नाही.
अॅशेस मालिका २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने २-१ ने आघाडी घेतली आहे. यामुळे अंतिम सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी यजमान इंग्लंडने संघात बदल केले आहेत. इंग्लंडने जेसन रॉय आणि क्रेग ओवरटनला संघाबाहेर केले आहे. तर त्यांच्या ठिकाणी सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांना संधी दिली आहे.
हेही वाचा -'चेंडूत फेरफार करण्यासाठी वॉर्नर हाताला चिकटपट्टी लावायचा'