लंडन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये अॅशेस मालिका सुरू असून या मालिकेत इंग्लंडचे चाहते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. इंग्लंडचे चाहते प्रामुख्याने चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगून मैदानात उतरलेल्या डेव्हिड वार्नरला 'टार्गेट' करताना दिसत आहेत. चौथ्या कसोटी दरम्यान, एका चाहत्याने वॉर्नरला थेट 'चीटर' म्हटले. पण त्यावर वॉर्नरने अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्या चाहत्याची बोलतीच बंद झाली.
VIDEO : 'चीटर' म्हणून हिणवणाऱ्याला डेव्हिड वार्नरचे अनोखे उत्तर, चाहत्याची बोलती बंद - डेव्हिड वॉर्नर
घडलं असं की, ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू डेव्हिड वॉर्नरसह मैदानावर जाण्यासाठी ड्रेसिंग रुममधून खाली उतरत होते. ज्यावेळी वॉर्नर ड्रेसिंग रुममधून बाहेर आला, तेव्हा एका चाहत्याने त्याला ‘चीटर’ म्हणून हिणवले. तसेच त्याने वॉर्नरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. पण यावर वॉर्नर मात्र अजिबात चिडला नाही. उलट त्याने एक विशिष्ट प्रकारचा आवाज करत आणि दोन्ही हात वर करत 'त्या' टीकेकडे दुर्लक्ष केले.
घडलं असं की, ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू वॉर्नरसह मैदानावर जाण्यासाठी ड्रेसिंग रुममधून खाली उतरत होते. ज्यावेळी वॉर्नर ड्रेसिंग रुममधून बाहेर आला, तेव्हा एका चाहत्याने त्याला ‘चीटर’ म्हणून हिणवले. तसेच त्याने वॉर्नरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. पण यावर वॉर्नर मात्र अजिबात चिडला नाही. उलट त्याने एक विशिष्ट प्रकारचा आवाज करत आणि दोन्ही हात वर करत 'त्या' टीकेकडे दुर्लक्ष केले.
U-१९ Asia Cup : भारताचा पाकिस्तानवर विजय, मुंबईच्या अथर्व अंकोलेकरची चमकदार कामगिरी
दरम्यान, वॉर्नरला यापूर्वीही अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोघांची ही पहिलीच अॅशेस मालिका असून या मालिकेत स्मिथ भन्नाट फॉर्मात आहे. मात्र, वॉर्नरला आतापर्यंत मालिकेत सूर गवसलेला नाही. वॉर्नरने या मालिकेतील ७ डावांमध्ये केवळ एक अर्धशतक ठोकले आहे.