मँचेस्टर- ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना 185 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी बढत घेतली आहे. शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला 383 धावा करावयाच्या होत्या. मात्र इंग्लंडचा संघ 197 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 211 आणि दुसऱ्या डावात 82 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
अॅशेस : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी - ASHES 2019
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १८५ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी बढत घेतली आहे.
इग्लंडच्या डेनलीने 53 धावा केल्या तर इतर कुणीही अर्धशतक केले नाही. जोस बटलर व बेन स्टोक्स यांची कामगिरीही वाईट होती. मात्र, ऑस्टेलियावर शेवटपर्यंत तणाव पसरला होता. कारण त्यांना 98 षटकातच इग्लंडच्या सर्व खेळाडूंना बाद करणे गरजेचे होते. 90 षटके झाली तरी इग्लंडचा लीच मैदानावर टीकून होता. मात्र लीचही बाद झाला आणि संपूर्ण इग्लंडचा संघ 91.3 षटकातच गारद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या कमिंस सर्वात जास्त म्हणजे 4 बाद केले व हेजलवूड आणि नथन लॉयनने प्रत्येकी 2-2 बाद कले. तर स्टार्क आणि लबुशाने प्रत्येकी, 1-1 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 8 बाद, 497 धावा केल्या होत्या तर इग्लंडने 301 धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 6 बाद, 186 धावांवर डाव घोषीत केला होता. आता इंग्ल्ंडसाठी 383 धावा करणे गरजेचे होते. मात्र, इंग्लंडला हे लक्ष्य पुर्ण करता आले नाही व त्यामुळे पराभव स्विकारावा लागला.