महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अरुण जेटलींच्या घरात पार पडले होते सेहवागचे लग्न! - डीडीसीए

अरुण जेटलींचा क्रिकेटशी फार जवळून संबंध आला आहे. वीरेंद्र सेहवागचे लग्न जेटलींच्या घरात झाले होते. २२ एप्रिल २००४ मध्ये सेहवागचे लग्न झाले होते. लग्नाआधी दोन वर्षांपासून सेहवाग आणि त्याची पत्नी डेट करत होते. जेटलींनी सेहवागला लग्नासाठी सरकारी निवास दिले होते. या लग्नात राजकारणातील आणि बॉलीवूडच्या दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

अरुण जेटलींच्या घरात पार पडले होते सेहवागचे लग्न!

By

Published : Aug 25, 2019, 9:56 AM IST

नवी दिल्ली -भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक क्रीडापटूंनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली दिली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही त्यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली. सेहवागची एक विशेष आठवण जेटलींशी जोडलेली आहे.

अरुण जेटलींचा क्रिकेटशी फार जवळून संबंध आला आहे. वीरेंद्र सेहवागचे लग्न जेटलींच्या घरात झाले होते. २२ एप्रिल २००४ मध्ये सेहवागचे लग्न झाले होते. लग्नाआधी दोन वर्षांपासून सेहवाग आणि त्याची पत्नी डेट करत होते. जेटलींनी सेहवागला लग्नासाठी सरकारी निवास दिले होते. या लग्नात राजकारणातील आणि बॉलीवूडच्या दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

तत्कालिन कायदामंत्री अरुण जेटली कैलास कॉलनी येथील सरकारी निवासात राहत होते. १९९९ ते २०१२ पर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) ते अध्यक्ष राहिले होते. या काळात दिल्लीमधून मोठेमोठे क्रिकेटपटू घडले. त्यामध्ये गौतम गंभीर, इशांत शर्मा, विराट कोहली, शिखर धवन यांचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details