नवी दिल्ली - अरुण जेटली स्टेडियमच्या (पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडीयम) एका पॅवेलियनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुरुवारी ही घोषणा केली. मी असा कधी विचारही केला नव्हता की, माझ नावं पॅवेलीयनला दिले जाईल. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे
डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथील आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. विराट कोहली म्हणाला, "इतका मोठा सन्मान केल्याबद्दल मी रजत शर्मा, भारतीय संघ, दिल्लीचे इतर संघ तसेच बीसीसीआयचा ऋणी आहे." तसेच कोहलीने आपल्या लहानपणीच्या प्रशिक्षकांचे सुद्धा आभार मानले आहेत.