महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 6, 2019, 2:35 PM IST

ETV Bharat / sports

कलम ३७० चं आमचं आम्ही बघू...गौतम गंभीरने आफ्रिदीला घेतले फैलावर

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू भडकला. संयुक्त राष्ट्रे काय करत आहेत असा सवाल करणाऱ्या आशयाचे ट्विट त्याने केले. त्याला प्रत्त्युतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर याने दिले. तो म्हणाला, आमचं आम्ही बघून घेऊ, असे सांगत त्याने आफ्रिदीला फटकारले.

कलम ३७० : आमचं आम्ही बघू...गौतम गंभीरने आफ्रिदीला घेतले फैलावर

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने नाराजी व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांवर टीका केली. तसेच त्याने या प्रकरणात अमेरिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर याने आफ्रिदीला खडेबोल सुनावले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण -

पाकिस्तानी क्रिकेटर आफ्रिदीने, संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार काश्मीरी जनतेचे अधिकार कायम राहिले पाहिजे. आपल्यासारखे त्यांनाही स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. भारताने ३७० कलम हटवले. संयुक्त राष्ट्रांची स्थापना का झाली आहे. ते आता झोपले आहेत का? काश्मीरमध्ये मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता आणि गुन्ह्यांची दखल त्यांनी घ्यायला हवी. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात मध्यस्थी करायला हवी, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

आफ्रिदीच्या या ट्विटला गौतम गंभीरने प्रत्त्युतर दिले. तो म्हणाला, मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता हा आफ्रिदीचा मुद्दा बरोबर आहे. याबद्दल आफ्रिदीचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे. पण तो एक गोष्ट विसरला आहे ते म्हणजे हे सारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडत आहे. हे लिहिण्याचे त्याच्याकडून राहून गेले. पोरा, तू या सगळ्याची काळजी करु नको. आम्ही आमचे बघून घेऊ, असा आशयाचे ट्विट केले आहे.

दरम्यान, यापूर्वी गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी एकमेकाविरुध्द मैदानात भिडले होते. तसेच त्यांच्यामध्ये ट्विटरवरुन खडाजंगी सुरूच असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details