चेन्नई - आयपीएल २०२१ च्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुनला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केले आहे.
लिलावाच्या अनकॅप खेळाडूंची नावे घेताना अर्जुनचे नाव आले नव्हते. मात्र, लिलावाचा शेवट होताना अखेरचे नाव अर्जुनचे आले आणि मुंबई इंडियन्स या एकमेव संघाने त्याच्यासाठी बोली लावली. २० लाख मूळ किमतीत अर्जुन मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला.
अर्जुनने मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेतून मुंबईच्या सीनिअर संघात पदार्पण केले आहे. यंदा पहिल्यांदाच अर्जुन आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे.