महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल लिलावापूर्वी सचिनच्या पोराचा मुंबईत कहर! - अर्जुन तेंडुलकर लेटेस्ट न्यूज

अर्जुन तेंडुलकरने ७३व्या पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ३१ चेंडूत नाबाद ७७ धावा चोपल्या. शिवाय, त्याने गोलंदाजीत ४१ धावांत ३ बळी घेतले.

अर्जुन तेंडुलकर
अर्जुन तेंडुलकर

By

Published : Feb 15, 2021, 9:58 AM IST

मुंबई -महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने ७३व्या पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ग्रुप एच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात अर्जुनने ३१ चेंडूत नाबाद ७७ धावा चोपल्या. शिवाय, त्याने गोलंदाजीत ४१ धावांत ३ बळी घेतले. या कामगिरीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखानाला १९४ धावांनी पराभूत केले.

एका षटकात पाच षटकार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अधिपत्याखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील ही पहिली क्रिकेट स्पर्धा आहे. २१ वर्षीय अर्जुनने आपल्या शानदार खेळीत ५ चौकार आणि ८ षटकार लगावले. ऑफ स्पिनर हशीर दफेदारच्या एका षटकात पाच षटकार मारले.

आयपीएलच्या लिलावात प्रथमच नोंदणी करणाऱ्या अर्जुनच्या कामगिरीव्यतिरिक्त सलामीवीर केविन डीएलमेडा (९६) आणि प्रणेश खांडिलेवार (११२) यांनी एमआयजीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नाणेफेक जिंकल्यानंतर एमआयजीने फलंदाजी स्वीकारत ४५ षटकांत ७ गडी गमावून ३८५ धावा केल्या.

हेही वाचा - चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोडला ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम!

प्रत्युत्तरादाखल इस्लाम जिमखानाचा संघ ४१.५ षटकांत केवळ १९१ धावांवर बाद झाला. अर्जुनसोबत अंकुश जयस्वाल (३१ धावात ३ बळी) आणि श्रेयस गुरव (३४ धावांत ३ बळी) यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. अर्जुनने यंदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून प्रतिनिधित्व केले.

१८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत अर्जुनचा समावेश करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details